उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदारांचा केला सत्कार
अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपने बाजी मारली भगवा फडकावला न भूतो न भविष्यती असा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला याबद्दल राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरवती जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला अभिनंदन केलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथे सागर बंगलावर जाऊन राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आणि सलग चौथ्यांदा रेकॉर्ड मताने विजयी आमदार रवी राणा यांनी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार रवी राणा (बडनेरा), आमदार प्रताप अडसड (धामणगाव रेल्वे), आमदार प्रवीण तायडे (अचलपूर), आमदार राजेश वानखडे (तिवसा), आमदार केवलराम काळे (मेळघाट) आणि आमदार उमेश उपाख्य चंदु यावलकर (मोर्शी) शाल- पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला. यावेळी अमरावती जिल्हा भाजप अध्यक्ष व राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांचे अमरावती जिल्हा कांग्रेस मुक्त केल्याबद्दल अभिनंदन केले. डॉ अनिल बोंडे आणि रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत. अश्या शुभेच्छा दिल्या.