एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, त्यानंतर ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री होणार

बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात शिवाजीनगर लगत असलेल्या रिकाम्या भूखंडाच्या डम्पिंग ग्राऊंडवर महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात येणाऱ्या घनकचऱ्याला पेटवल्यामुळे त्या धुराच्या त्रासाने नागरिकांना श्वास, दम्याचा व श्वासासंबंधी गंभीर आजाराने नागरिक त्रस्त झाली असून येथे घनकचरा टाकणे* बंद करावे. अशी मागणी नागरिकात जोरधरत आहे.
बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात शिवाजीनगर स्थित असलेल्या भूखंडावर महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केलेले आहे या डम्पिंग ग्राउंड वर मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज शहरातील घनकचरा आणून टाकला जातो कचऱ्याचे ढिगच्या ढीग साचल्यामुळे अनेकदा या कचऱ्याच्या ढिगाराला आग लागली जाते व आगीचा दुर्गंधीयुक्त धूर शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरतो त्यामुळे लहान बालकासह ज्येष्ठ नागरिक व ईतर सामान्य नागरिकांना या धुराचा गेल्या दोन वर्षांपासून अतोनात त्रास सहन करावा लागत आहे या दुर्गंधीयुक्त धुरामुळे दमा श्वासासंबंधी आजार वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मनपा ने या ठिकाणी घनकचरा टाकू नये असे गेल्या दोन वर्षापासून नागरिकांनी महानगरपालिकेकडे निवेदने सादर केली आहेत मात्र त्यांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी सिटी न्यूज बोलताना व्यक्त केला.बरेचदा आगीचे डोंब मोठ्या प्रमाणात उठल्याने घरांना आगी पासून नुकसान संभावण्याची व जिवित हाती होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.अनेकदा अग्निशामक दलाला सुद्धा पाचारण करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.व यासंबंधीची कैफियत मांडण्यासाठी शिवाजी नगरातील शेकडो महिला पुरुष एकत्र येऊन त्यांनी आपल्या संतप्त भावना आमचे सिटी मच्छिंद्र भटकर यांच्या जवळ व्यक्त केल्या. जर या परिसरातील डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकणे बंद केले नाही. तर घण कचऱ्याच्या गाड्या अडवण्या बाबत आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे तरी महानगरपालिकेने या गंभीर बाबीची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा व त्यांच्या सोबत होणारा जीवघेणा खेळ थांबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.