AmravatiEducation NewsLatest NewsLocal News
तक्षशिला महाविद्यालयातील भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित तक्षशिला महाविद्यातील विज्ञान विभागातील 40 च्या वर विद्यार्थांनी नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाला भेट दिली. यावेळी भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुले तसेच सहकारी शिक्षक प्राध्यापक. सुरज तायडे व प्रा. अभिषेक धालसकर यांनी सर्वांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले . ही शैक्षणिक भेट तक्षशिला महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे शिक्षक प्रा. कुणाल मेंडके, प्रा.हेमा उपाध्याय व प्रा. आदर्श येवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती