LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

 मुंबई, दि. २६ : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी  दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

१६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली.  पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच ‘बिगुलर्स लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!