भारतीय संविधान संवर्धनाची जबाबदारी तरुणांची- प्राचार्य डॉ.आराधना वैद्य

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्नित भारतीय विद्यामंदिर द्वारा संचालित,भारतीय महाविद्यालय,अमरावती येथे संविधान दिन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, कार्यक्रमाचे वक्ते डॉ. प्रशांत विघे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. सुमेध आहाटे डॉ. मिता कांबळे, डॉ. वैशाली बिजवे व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे हारर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आराधना वैद्य म्हणाले की, भारतीय संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा आहे. या कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी देशातील प्रत्येकांची आहे. संविधान हे देशातील सर्व घटकाला समानतेची वागणूक देण्याचं काम करते त्यामुळे देशातील तरुणांची संविधानाचे संवर्धन करण्याची जबाबदारी मोठी आहे असे प्रतिपादन केले.
डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, देशातील संविधानाला ७५ वर्ष झाली आहेत.२६ नोव्हेंबर १९४९ ला देशाच्या संविधान निर्मितीचे काम पूर्ण झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानात देशातील जनतेमध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती. त्या दृष्टिकोनातून विविध कलमांचा अंतर्भाव भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे असे प्रतीपादन केले.
पुढे डॉ. सुमेध आहाटे म्हणाले की, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजामध्ये असणारी सामाजिक-आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे, त्याची परिणीती म्हणून आज समाजातील सर्व वर्गांना समानतेची वागणूक दिली जाते अशी प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनएसएसचे स्वयंसेवक, प्रा. डॉ.विक्रांत वानखडे,प्रा. हेमंत बेलोकर,प्रा. शुशील गावंडे,प्रा. संतोष घासले, प्रा. स्वप्नील वानखडे तसेच विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच सूत्र संचालन आणि आभार डॉ. वैशाली बिजवे यांनी व्यक्त केले.