AmravatiLatest NewsMaharashtra Politics
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची अडसड कुटुंबियांना भेट

अमरावती : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज अरुणभाऊ अडसड यांच्या कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली. राज्यपाल श्री. बागडे यांनी गनेडीवाल ले-आउट येथील अडसड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. अडसड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अडसड कुटुंबियांच्या वतीने श्री. बागडे यांचे औक्षवण करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीनंतर ते नागपूरकडे रवाना झाले.