संविधानाचे मूल्य समाजातील शेवटच्या माणसापर्यंत रुजविणे काळाची गरज ..! समाज भूषण राजूजी नन्नावरे

अमरावती – स्वतंत्र भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशी राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना बहाल केली . संविधानामुळे देशात कायद्याचे राज्य स्थापित झाले. समता, स्वातंत्र्य ,न्याय व बंधुत्व हे भारतीय राज्यघटनेचे मूल तत्त्व आहेत. याच तत्वाच्या आधारावर आज भारत देश हा विविध जाती, धर्म ,पंथ व भाषा, संस्कृतीने नटलेला असून सुद्धा आपणास एक संघ दिसतो . पुढेही भारत एक संघ रहावा या करिता संविधानाचे महत्त्व समजणे अत्यंत गरजेचे असून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत संविधानाचे मूल्य रुजविणे ही काळाची गरज आहे. संविधानाचा प्रचार, प्रसार व त्याचे मूल्य प्रत्यक्ष समाजामध्ये अंतर्भूत व्हावे ..! या करिता संविधान दिवस साजरा करण्यात येत असतो असे समाजभूषण राजूजी नन्नावरे यांनी स्पष्ट केले.
– भारत एक संघ आहे हे खऱ्या अर्थाने संविधानाचेच धोतक आहे .या सर्व बाबींचे श्रेय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते . असे सुद्धा राजूजी म्हणाले.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम निरंतर मागील ९ वर्षा पासून एकता रॅली घेत आहे. हे यावेळी नमूद करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक भव्य दिव्य असा गुलाब फुलाचा हार. एकता रॅलीचे अध्यक्ष अतुल गायगोले, जैन संघटनेचे राष्ट्रीय नेते सुदर्शनजी जैन, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट , महाराष्ट्र बँक निवृत्त अधिकारी अरुण कुमार आठवले व समाज भूषण राजूजी नन्नावरे व अन्य प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात पुष्प हार वाहण्यात आला.
सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञ होऊन त्यांच्या नावाच्या त्रिवार घोषणा करून संविधानाचा विजय असो,,,,, असा जयघोष केला.
यावेळी समाज भूषण राजूजी नन्नावरे हे करीत असलेले मागील २५ वर्षापासून निरंतर सामाजिक कार्य याकरिता त्यांचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर गोविंद कासट, सुदर्शनजी जैन, अतुलजी गायगोले, डॉक्टर राजू डांगे, डॉक्टर मंगेश मेंढे उपस्थित सर्व मान्यवरांनी केला.
सकाळी ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, कॅम्प रोड ,अमरावती या ठिकाणी अभिवादनाचा एकता रॅलीचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख नेत्यासह सुप्रसिद्ध योग तज्ञ डॉक्टर राजू डांगे ,आयुर्वेदाचार्य डॉक्टर नितीन भागवत ,सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर मंगेश मेंढे, माजी क्रीडा अधिकारी अशोक खंडारे ,
कास्ट्राब संघटनेचे नेते पी. बी. इंगळे, एल.जे .वानखडे ,भारत थुल ,मिलिंद कांबळे, प्रसिद्ध गायक मोहन इंगळे सर, लोभेश्वरजी रंगारी ,राजेश फुले, नाना रमतकर ,आनंदराव इंगळे, आदी मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेऊन अभिवादन केले . यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे जयघोष करून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. वाचन मोहन इंगळे सर यांनी केले. तर एक दुसऱ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. असे एकता रॅली चे प्रसिद्धी प्रमुख राजेश फुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.