संविधान सन्मान दिना निमित्य भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयोजन..
अमरावती २६ नोव्हेंबर – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार कसा चालवावा म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान देशाला अर्पित केले. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. म्ह्णूनच जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्व अधोरेखित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहर च्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधानाने देशाला स्वातंत्र्य,समता, बंधुत्व,न्याय ही लोकशाही मूल्ये बहाल केली असल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रशांत डवरे यांनी मनोगत व्यक्त केले. संविधानाप्रती जनजागृती करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान दिन साजरा होत असून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत संवैधानिक मूल्ये व अधिकार पोहोचले पाहिजे, यासाठी सर्वानी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मनोगत मनपा माजी सभापती -भूषण बनसोड यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान निर्मितीच्या मसुदा समितीमध्ये शिक्षण महर्षी-डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सुद्धा सदस्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहर च्या वतीने पंचवटी चौक स्थित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना दोन मिनिटे मौन धारण करून मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन -माजी नगरसेवक मंगेश मनोहर व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपा माजी स्थायी समिती सभापती -अविनाश मार्डीकर, माजी सभापती -भूषण बनसोड, माजी नगरसेवक- मंगेश मनोहरे, प्रवीण मेश्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत ,प्रमोद महल्ले , संदीप मामा आवारे, अजय कोळपकर, अशोक हजारे, बंडू निंभोरकर, चंदू कांबळे, सतीश राऊत, भास्कर ढेवले, विजय शिरभाते, शक्ती तिडके, राहुल इंगळे, स्मिताताई बनसोड, अनिताताई गवई, दुर्गाताई झाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आकाश हिवसे, संकेत बोके, जयेश सोनोने, सार्थक खोरगडे, संकेत निंभोरकर, स्वराज रोडे, अभिजित लोयटे, प्रमोद धनाडे, श्रवण भोरे, रोशन शेनोडे, छोटू दळवी, उमेश जगताप आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सर्व सहकारी उपस्थित होते.