अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित

अमरावती (दि. 27.11.2024) – कलिंगा इन्स्टिट¬ुट ऑफ इन्डस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवने·ार (ओरिसा) येथे 24 ते 27 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
पुरुष संघ
चमूमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश चांदुरकर व आयुष वानखडे, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारचा सुमित गुरमुले, हर्षल दैत, हिमांशू चरडे, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतचा अनिरुध्द खंडारे, बी.बी. आर्टस्, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज, दिग्रसचा अमर डाखोरे, सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा राज भारसाकळे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा सुमेध मोहोड, बी.एस. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगांव काळेचा शिवा अदवे, गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शी टाकळीचा सुरज खानझोडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा आशीष जढाळ, बॅरी.आर.डी.आय.के. अॅन्ड के.डी. महाविद्यालय, बडनेराचा चेतन भुरेवाल, पंकड लढ्ढड इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज, बुलडाणाचा श्रीराज राजुरकर.
महिला संघ
महिला संघामध्ये विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारची कु. श्रेया खंडार व कु. साक्षी तोटे, जगदंबा महाविद्यालय, अचलपूरची कु. मानसी च-हाटे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. मंडिंगबम एछानबी व कु. अनन्या सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रज्ञा मोरे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराची कु. रिध्दी पोटे व कु. सिध्दी पोटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीची कु. गौरी खवले, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. आस्था कबीर व बी.बी. आर्टस्, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज दिग्रसची कु. प्रियंका राठोड यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
पुरुष व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 12 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.