*कौंडण्यपूर येथे महोत्सव विदर्भाचा….विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुख्मिणी महोत्सव 2024 चे भव्य आयोजन*

*नयनरम्य बोटिंग शो (नौका स्पर्धा) व १ लाख दिव्यांचा दीपोत्सव ठरणार महोत्सवाचे आकर्षण: स्वागताध्यक्ष रविराज देशमुख*
*दिनांक २९, ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर दरम्यान रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी*
*अमरावती दिनांक २७ नोव्हेंबर २०२४:* विदर्भाची पुरातन राजधानी माता रुक्मिणीचे माहेरघर आणि कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तिपीठ असलेल्या अमरावती च्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपुर येथे कार्तिक यात्रे मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा महोत्सव विदर्भाचा विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुक्मिणी महोत्सव 2024 चे आयोजन दिनांक 29, 30 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम नयनरम्य बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धाचे आयोजन ज्यामध्ये विजेत्या बोटिंगला आकर्षक बक्षिसे (प्रथम बक्षीस ११,००१ रुपये, द्वितीय बक्षीस ५००१ रुपये, तृतीय बक्षीस ३००१ रुपये) त्यानंतर एक लाख दिव्यांचा दीपोत्सव, त्यानंतर अंबा रुक्मिणी प्रतिमेचे नौका प्रदर्शन अशा नयनरम्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २९ नोव्हेबर रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले असून सायंकाळी ६.०० वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार असून या संपूर्ण समारंभाचे स्वागताध्यक्ष रविराज हिम्मतराव देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र) हे राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७. ०० वाजता मैफिल स्वरांची नामक बहारदार संगीत रजनी चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुप्रसिद्ध गायक व संगीकार राहुल तायडे व संच (अमरावती) यांचा सहभाग असणार आहे.
त्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता विदर्भस्तरिय भव्य एकता मॅरेथॉन (खुला गट) चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विजेत्या स्पर्धकांना हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता महाराष्ट्र ग्राम दर्पण व अंबा रुख्मिणी महोत्सव समिती, सर्व मंदिर समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान व नदी घाट सफाई मिशन राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता रविराज देशमुख मित्रपरिवार, अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती, स्व. शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर, जीवन आधार बहुद्देशीय संस्था नागपूर व महाराष्ट्र ग्राम दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ७५ तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून यामध्ये सर्व तपासणी निःशुल्क असणार आहे. त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांची मोफत शस्त्रक्रिया व त्यांची जाण्याची, राहण्याची व खाण्याची व्यवस्था सुद्धा मोफत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता शस्त्रक्रियेसाठी ज्या रुग्णांना नागपूर येथील उच्च दर्जाच्या स्व. शालिनीताई मेघे हॉस्पिटल पाठवायचे आहे. त्यांना मोफत बसद्वारे रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता भव्य रांगोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी २.०० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित “भाऊसाहेब” या चित्रपटाचे ऑडिशन ठेवण्यात आले असून यामध्ये स्थानिक कलावंतांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता समारोप व बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.
सदर पत्रकार परिषदेला अंबा रुख्मिणी 2024 चे स्वागताध्यक्ष रविराजभाऊ देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र), अक्षय पुंडेकर, श्री गजाननराव बांबल, श्री संतोषभाऊ मठिये, श्री अंकुशभाऊ देऊळकर, श्री सचिनदादा इंगळे, अमोलभाऊ पुंडेकर, रोशनभाऊ भगत, आकाश भाऊ ठाकरे, प्रशांत भाऊ ठाकरे आदींची उपस्थिती होती.