LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महानिदेशकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती के. नंदिनी सिंगला यांचा आंतरराष्ट्रीय लोक महोत्सवात डॉ मनीष गवई यांनी केला सत्कार

मेळघाटच्या आदिवासी कला संस्कृतीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी द्या – डॉ मनीष गवई

अमरावती – भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध आणि परस्पर समज प्रस्थापित करणे, पुनरुज्जीवित करणे आणि मजबूत करणे.इतर देशांसोबत सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे.त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व उपायांचा अवलंब करणे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना करणात आली असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महानिदेशकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती के. नंदिनी सिंगला यांचा आंतरराष्ट्रीय लोक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ मनीष गवई यांनी सत्कार केला आणि मेळघाटच्या आदिवासी कला संस्कृतीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्याचे मागणी देखील या प्रसंगी केली. 

८ व्या भारत आंतरराष्ट्रीय लोक महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री, भारत सरकार  श्री पबित्रा मार्गेरिटा यांनी केले या प्रसंगी विविध देशातील सांस्कृतिक प्रतिनिधी आणि विविध देशातील राजदूतसह डॉ. एच के सेठी · सरचिटणीस भारतीय पत्रकार महासंघ आणि भारतीय पत्रकार संघ  उपस्थित होते. भारतीय संस्कृती आणि वारसा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नकाशावर प्रक्षेपित करणे आणि भारताला भारतीय दृष्टीकोनातून सादर करणे आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची निर्मित करण्यात आली असून 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या महासंचालक म्हणून श्रीमती के. नंदिनी सिंगला यांनी पदभार स्वीकारला, त्यापूर्वी त्यांनी  डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत मॉरिशसमध्ये भारताच्या उच्चायुक्त म्हणून काम केले.तत्पूर्वी, श्रीमती. नंदिनी सिंगला या जुलै २०१६ ते डिसेंबर २०२० या कालावधीत पोर्तुगालमध्ये भारताच्या राजदूत होत्या. एप्रिल 2015 ते जून 2016 पर्यंत, तिने परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव (युरोप वेस्ट) म्हणून काम केले, जिथे त्यांनी  EU, UK, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, इटली, बेल्जियम, पोर्तुगाल यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे समन्वय साधले. , लक्झेंबर्ग, आयर्लंड , मोनॅको आणि अंडोरा सह भारताचे संबंध हाताळले.करिअर डिप्लोमॅट, श्रीमती. नंदिनी सिंगला 1997 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एम.फिल. केले आहेत. त्या कर्नाटकातील असून कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच बोलते.

अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई हे देखील अंतर्राष्ट्रीय सार्क सांस्कृतिक संघटनेचे युवा दूत असून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक फोरमचे सल्लागार सदस्य  आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात त्यानी  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व केले आहे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया  सह सार्क देशात युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व  मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद  साधला असून मैत्रीचा संदेश दिला आहे. संवैधानिक दर्जा असणाऱ्या पदासाठी महिला महानिदेशकाची निवड  ही देशभरातील कलाकारांसाठीअभिमानाची बाब असून  डॉ  गवई यानी श्रीमती. नंदिनी सिंगलायांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भारतीय सविधानाची प्रती देऊन त्यांचा सत्कार  केला. यावेळी मेळघाटातील आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध आहे.मेळघाटातील आदिवासी संस्‍कृती, परंपरेचे जतन व्हावे आणि मेळघाटच्या आदिवासी कला संस्कृतीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्याचे मागणी देखील डॉ मनीष गवई यांनी या प्रसंगी केली तसेच मेळघाटच्या आदिवासी संस्कृतीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी मेळघाटला येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!