Maharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024
शिंदेच्या पत्रकार परिषदेनंतर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. महाराष्ट्राच्या विकासासाठी यशस्वी योजना आणि अभियान त्यांच्या कार्यकाळात राबविले गेलेत. महायुतीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काम केलीत. महायुतीच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम केलेत. कोणत्याच निर्णयाचा विरोध न करता फक्त राज्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे हे काम करत राहिले. सध्या सत्ता स्थापनेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका खूप मोठी आहे, त्यांचे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आभार मानतो, महायुती मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खूप काम केलेत्, असेही चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले…