संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिन साजरा संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधान दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन उपस्थितांनी केले. याप्रसंगी कुलगुरूंनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित होते.
संविधान दिनाबद्दल विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी माहिती देऊन संविधान दिनाचे महत्व सांगितले. संविधान दिन कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ.संदीप वाघुळे तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.