सुनील सोमवंशी यांची पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर वर्णी

अमरावती : शिवतीर्थ प्रतिष्ठान वरुड मोर्शीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. राज्यसभा खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोमवंशी हे गेल्या दशकभराच्या काळापासून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती केली आहे. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे संचालित मोर्शी येथे अलीकडेच शासनाने मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुद्धा मंजूर केले आहे. त्यासाठी डॉ.अनिल बोंडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सुनील सोमवंशी यांच्या नियुक्तीबद्दल राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.