अमरावतीत राज्यस्तरीय सुतार समाज वधुवर परिचय मेळाव्याचं आयोजन
राज्यस्तरीय सुतार समाज वधुवर परिचय मेळाव्याच आयोजन संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्ट गाडगेनगर येथे करण्यात आलं मोठ्या संख्येनं वधू वर व त्याचे पालक मेळाव्याला उपस्थित होते माजी खासदार नवनीत राणा व आ. संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वधू वरांनी आपला परिचय दिला विश्वकर्मा सेवा मंडळ, सुतार विकास संस्था, विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट जेवड नगर, जिल्हा सुतार समाज समन्वय समिती,विश्वकर्मा युवाशक्ती बहुद्देशीय मंडळ कार्यक्रमात सहभागी झाले
संत गाडगेबाबा समाधी मंदिर गाडगेनगर येथे राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं .उद्योजक सुनील खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचं उदघाटन उद्योजक पांडुरंग सातनोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं .आ संजय रायमुलकर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती . मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलं करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .यावेळी दिलीप अकोटकर, पंडितराव देवीकर ,विष्णुपंत कुळवंत प्रवीण कुंडलकर संजय ईश्वरकर यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते . सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा संस्था अमरावती यांच्या वतीने आयोजित परिचय मेळाव्यात . वधू वरांनी आपलं नाव नोंदवलं. उपस्थित महिलांनी सांगितलं कि, या मेळाव्यामुळेच आपले विवाह झालेत.मोठ्या संख्येनं वधु वर व त्यांचे पालक मेळाव्याला उपस्थित होते