ईव्हीएम हॅकिंगचा दावा भोवला, हॅकरविरोधात गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाला. महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले अन् ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला. अनेकांना ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा केला. एका तरुणाला ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणं भोलवलं आहे. त्याच्याविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद शुजा यानं ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सय्यद शुजा याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली. आयोगानं तातडीने कारवाई सुरु केली. आयोगाच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी सय्यद शुजा याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून याप्रकरणी आता अधिक तपास करण्यात येत आहे. सय्यद शुजा याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.
निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सय्यद यानं ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत होते. व्हायरल व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाची मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी सय्यद शुजा याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.