एसटी महामंडळाचा राज्य सरकारकडे 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव

एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई-पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे. याआधी 2021 साली शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं, म्हटलं जातंय. आमच्या प्रतिनिधी ने अमरावती एस टी महामंडळ अधिकारी बेलसरे यांना भ्रम्हणंध्वनी वरून संपर्क साधला असता, या आदेशाचे परिपत्रक प्राप्त झाले नाही फक्त शासना कडे प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यामुळे सध्या एस टी मध्ये भाव वाढ नाही अशी माहिती देण्यात आलीय