दर्यापूर अकोला राज्य महामार्गावर चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक
टोंगलाबाद लासुर च्या मध्ये पुला जवळील घटना
दर्यापूर अकोला राज्य महामार्गावर चार चाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली टोंगलाबाद गावा जवळील हि घटना आहे हि धडक इतकी भीषण होतीं कि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर तिघेजण गम्भीर जखमी झाले आहेत दोन गाडयांची जबरदस्त धडक लागल्याने गाडयांच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला एका गाडीचं चाक दुसऱ्या गाडीखाली आलं त्या चाकावर गाडी उभी आहे असं विचित्र व अंगावर शहारे आणणारं दृश्य येथील होतं .
दर्यापूर अकोला राज्य महामार्गाने भरधाव वेगात जाणाऱ्या चार चाकी वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली दोन डिसेंबर ची दुपारी ३ वाजताच्या सुमाराची हि घटना आहे धडक इतकी भीषण होती कि गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे आधारकार्ड मिळाले असून एका कार्डवर विनीत गजाननराव बिजवे तर दुसऱ्या आधार कार्डवर प्रतीक मधुकरराव बोचे असे नावे आहे
लासुर गावाजवळील भागात वळण मार्गावर हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघात एवढा मोठा होता की दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग चेंदामेंदा झालेत या अपघातात तिघे गंभीर जखमी. झाल्याची माहिती आहे दोन पैकी एका गाडीचा क्रमांक एम एच २९ बीसी ७७८६ असा आहे
अकोला येथे दोन जखमींना संजीव भारसाकळे यांनी अकोला येथे आयकॉन मध्ये भरती केले सदर घटनेचा तपास येवदा पोलीस करीत आहे