फेंगल चक्री वादळाचा फटका, तापमानात अचानक वाढ

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल वादळाच्या प्रभावामुळे केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस पडत आहे
फेंगल चक्रीवादळ 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता पुडुचेरीमधील कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. हे वादळ आता केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पोहोचले आहे
फेंगल’ हे नाव सौदी अरेबियाने सुचवले होते. त्यानंतर येणाऱ्या पुढील चक्रीवादळाचे नाव ‘शक्ती’ असेल आणि हे नाव श्रीलंकेने सुचवले आहे… याच चक्रीवादळाचा परिणाम अनेक राज्यात दिसून येत आहे.. विदर्भात सुद्धा अचानक फेंगल चक्री वादळाने अचानक वातावरणात बदल झाला.य . आता थंडी चा जोर कमी जाणवत आहे तर तापमाणात वाढ झाली आहे.. चक्री वादळाने अमरावती जिल्ह्या सह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले.. हा जोर दोन दिवस जाणवणार अशी प्रतिक्रिया श्री शिवाजी कृषी हवामान विभागाचे प्रा अनिल बंड यांनी आमच्या सिटी न्यूज कडे दिलीय