श्री समर्थ गजानन_महाराज संस्थानाच्या पायदळ वारीचे टाळ-मृदंगाच्या तालात प्रस्थान
समर्थ कॉलनी येथील श्री समर्थ गजानन महाराज संस्थानाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले . सलग तिस:या वर्षी हे आयोजन करण्यात आले आहे. आज 1 डिसेंबर रोजी टाळ, मृदुंगाच्या गजरात ही पायदळ वारी शेगावकडे रवाना झाली गेल्या दोन वर्षांपासून या वारीत 200 महिला व पुरुष भक्त सहभागी होतात. यंदाही चिमुकल्यांसह ज्येष्ठही या वारिमध्ये सहभागी झाले
श्री समर्थ गजानन महाराज संस्थानाकडून दरवर्षी 1 डिसेंबरला या अमरावती ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून या वारीत 200 महिला व पुरुष भक्त सहभागी होतात. तसेच चिमुकल्यांसह ज्येष्ठही या वारिमध्ये सहभागी होतात. 1 डिसेंबरला सकाळी 7 वाजता समर्थ कॉलनी येथून समर्थ गजानन महाराज संस्थानातून वारिचे प्रस्थान झाले
राठी नगर येथे प्रशांत गहुकर यांच्या घरी पालखीचे पूजन आरती करण्यात आले तसेच सिकची रीसोड वलगाव येथे पालखीचे पूजन आरती करण्यात आली. त्याचबरोबर दीपक गुडदे खारतळे गाव यांच्या शेतात गुडदे परिवाराच्या वतीने स्नेहभजनाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या शेतात अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वाद्य बैल बंडी सह सजावट करण्यात आली
टाळ मृदंगाच्या गजरात भक्तांनी ताल धरला होता भावभक्तीमध्ये तिथून धामोरी या गावी निघाले आणि १ डिसेम्बरचा मुक्काम धामोरी या ठिकाणी तेथील शाळेत करण्यात आला