अचलपूर बाजार समितीमध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक मक्याची आवक

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर बाजार समितीमध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक मक्याची आवक झाली आहे , मध्यप्रदेश येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची शेती केल्यामुळे अचलपूर बाजार समितीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याच्या आवक मध्ये वाढ झाली आहे , मध्यप्रदेश येथील बाजार समितीमध्ये मक्याला कमी भाव मिळत असल्यामुळे पहिली पसंती म्हणून पर राज्यातील शेतकरी अचलपूर बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल आणत आहेत दोन दिवस खरेदी न करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलाय
अचलपूर बाजार समितीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मक्याची आवक झाली आहे , दोन दिवस मक्याची खरेदी न करण्याचा बाजार समिती कार्यालयाने निर्णय घेतलाय
मध्यप्रदेश येथील बाजार समितीमध्ये मक्याला त्यामानाने कमी भाव मिळत असल्यामुळे पहिली पसंती म्हणून पर राज्यातील शेतकरी अचलपूर बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल आणत आहे त अचलपूर बाजार समितीमध्ये शेतमालाचा काटा झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात पैसे मिळत असल्यामुळे शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात शेतमाल अचलपूर बाजार समितीमध्ये आणत आहे , वाढत्या धान्याच्या आवक मुळे बाजार समिती परिसरामध्ये धान्याच्या पोत्यांचे ढिगचे ढीग लागले आहेत यामुळे बाजार समिती कार्यालयाने दोन दिवस धान्याची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे , अशी माहिती बाजार समितीचे सभापती व संचालकांनी दिली आहे,