India News
ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी

आगरामधील ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे पर्यटन विभागाला मिळाली आहे. या ईमेलनंतर ताजमहालची त्वरित सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजमहालच्या तपासासाठी बॉम्ब निकामी पथक आणि इतर पथके दाखल झाली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे .