नया अकोला येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन सभा

नया अकोला येथील श्रध्दा भूमी वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारक येथे गेल्या दोन वर्ष पासून महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन सभा आयोजित करण्यात येतेय या वर्षी ही अभिवादन यात्रा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीच्या अभिवादन समारोहाला कर्नाटक चे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
महा परिनिर्वान दिनानिमित्त ॲड.यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील (इरविन चौक) डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून नया अकोला कडे अभिवादन यात्रा मार्गस्थ होईल.या अभिवादन यात्रेला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण शहर ,महिला आघाडी,युवक काँग्रेस,अनुसूचित जाती विभाग,ओबीसी विभाग,अल्पसंख्याक विभाग,सेवा दल आणि सर्व विभागांचे चे नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होतील.या अभिवादन बाईक आणि कार यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा आणि शहर काँग्रेस च्या वतीने करण्यात आले आहे.