परम पुज्य विविक्तश्री माताजी यांचं अभिनंदन पेंढारी यांच्याकडे आगमन

भारत गौरव राष्ट्रसंत गणाचार्य श्री विरागसागऱजी महाराज यांच्या शिष्या परम पुज्य गुरु माँ वात्सल प्रदात्री 105 श्री विविक्तश्री माताजी तसंच 105 विकंठश्री माताजी संघाचं अभिनंदन पेंढारी यांच्या विनस पार्क शेगाव नाका येथील निवासस्थानी विहारकरत असताना आगमन झालं यावेळी पेंढारी परिवाराच्या वतीने त्याचे पाद प्रक्षालनकरून स्वागत करण्यात आलं यावेळी श्री विविक्तश्री माताजी यांनी उपस्थिताना जैन धर्मातील सत्य, अहिंसा अपरिग्रह, अचौर्य व क्षमा या बाबत सांगितलं
जैन धर्मातील सत्य, अहिंसा अपरिग्रह, अचौर्य व क्षमा सिद्धांतावर आधारित आहेत दान, त्याग, दया, तपस्या यावर जैन धर्मात जोर दिला जातो गणाचार्य श्री विरागसागरजी महाराजयांनी अठरा लिपिमध्ये वर्णमाला व बाराखडी तयार केली आहे जी आजपर्यँत कोणी करू शकलेलं नाही आदिनाथ भगवान यांनी आपली मुलगी ब्राम्ही च्या नावावर ब्राम्ही लिपी तयार केली परंतु माताजी म्हणाल्या कि माझे गुरु विरागसागरजी यांना 18 लिपिचं निर्माण करणं असंभव होत ते र्त्यांनी संभव केली आहे या लिपी विदयार्थ्यांना पाठयक्रमात सामील केलं जावं अशी आपली इच्छा असल्याचं माताजी नि सान्गितल …. सरकारच्या सहयोगाने हे शक्य होईलअसंही त्या म्हणाल्या हे काम अभिनंदन पेंढारी व उल्हास क्षीरसागर यांना सोपवल्याचं त्यांनी सांगितलं दोघंही प्रयत्नशीलआहेत त्याना मी आशीर्वाद देते असे आशीर्वचन माताजींनी दिले …. प्रकाश भंडारी यांनी मगलाचरणने सुरुवात केली कार्यक्रमाच संचालन अभिनंदन पेंढारीयांनी केलं … यावेळी अनिल सुराणा, अनिल पेंढारी, विनोद खडारे, भरत देवलसी, अमृत मुथा, पुरुषोत्तम मुंदडा,मनोज वालचाळे,प्रकाश बोकरिया, नितीन बन्नोरे, राजेश गुलालकरी, अजिक्य पेंढारी, गोवर्धन कोहळे, संगीता क्षीरसागर, त्रिकोटी,विनया देवलसी, वन्दना व स्मिता रायबागकार, माधुरी पेंढारी, अपर्णा गुलालकरी, कोमल गरिबे, अनिला, अमृता, मयुरी पेंढारी उपस्थित होते