LIVE STREAM

Latest NewsSports

वयाच्या २२व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त; ७०,००० कोटी रुपयांची संपत्ती; विराट-धोनीपेक्षा श्रीमंत असलेला हा क्रिकेटपटू आहे तरी कोण?

भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी किंवा सचिन तेंडुलकर म्हणेल. या भारतीय क्रिकेटपटूंची संपत्ती हजार कोटींहून अधिक आहे. या खेळाडूंची नावे एक ब्रँड बनली आहेत, पण एक भारतीय क्रिकेटर असा आहे जो विराट, धोनी आणि सचिनपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. या क्रिकेटपटूकडे एवढी संपत्ती आहे की तो स्वत:साठी आयपीएल संघही खरेदी करू शकतो, पण दुर्दैवाने हा खेळाडू आयपीएलचा एकही सामना खेळू शकला नाही.

आर्यमन बिर्ला असे या खेळाडूचे नाव आहे. आर्यमानने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला विराम दिल्यानंतर वडील कुमार मंगलम बिर्ला यांचा व्यवसाय हाती घेतला आहे. आर्यमन बिर्ला हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. जर आपण त्याच्या संपत्तीबद्दल बोललो तर ते ७०,००० हजार कोटींहून अधिकचे मालक आहेत. एवढी अफाट संपत्ती असूनही आर्यमन टीम इंडियासाठी खेळू शकला नाही.

आर्यमन मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला
आर्यमन बिर्लाला सुरुवातीला वडिलांच्या व्यवसायापेक्षा क्रिकेटमधील करिअर वेगळे करायचे होते. आर्यमनने यासाठी खूप मेहनत घेतली. आर्यमनने २०१७ मध्ये मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्याला लिस्ट ए मध्येही खेळण्याची संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेट आर्यमनने ९ सामन्यांच्या १६ डावात १ शतक आणि १ अर्धशतकासह एकूण ४१४ धावा केल्या. याशिवाय आर्यमनला ४ सामन्यात केवळ ३६ धावा करता आल्या. आर्यमनने शेवटचा मैदानात २०१९ मध्ये उतरला होता, जेव्हा तो केवळ २२ वर्षांचा होता.

क्रिकेट सोडल्यानंतर आर्यमन वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. २०२३ मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड मध्ये संचालक म्हणून आर्यमनचा आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. ते आदित्य बिर्ला मॅनेजमेंट लिमिटेड आणि ग्रासिम इंडस्ट्रीज या दोन्ही मंडळांचे संचालक देखील आहेत आणि त्यांना समूहाचे भविष्य मानले जाते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!