उद्धव ठाकरेंकडून पुन्हा हिंदुत्वाचा नारा ; महाविकास आघाडीचं काय होणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

विधानसभा निवडणूकीत मविआला मतदारांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे सतर्क झाले. एकीकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीत गोंधळ असतांना उद्धव ठाकरे मात्र महापालिका निवडणूकांच्या तयारीला लागले. विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंना कॉग्रेस राष्ट्रवादीपेक्षा चांगले आमदार निवडून आणता असले तरी उद्धव ठाकरे सत्तेपासून फार दुर राहिले. म्हणून उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपल्या शिवसैनिकांना ज्वलंत हिंदुत्त्वाचा मुद्दा लोकापर्यंत पोहचवा असे आदेश मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दिलेत.
नेमकं काय म्हटले उद्धव ठाकरे ते पाहूयात…
हिंदुत्त्वाचा नारा मुंबई पालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा
हिंदुत्त्वासाठी शिवसेना लढत होती,
लढत आहे आणि यापुढेही लढेल हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार सुरु,
त्याला योग्य तो प्रतिवाद करा निवडणुकीसाठी कामाला लागा,
मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे.
उद्धव ठाकरेंनी मविआसोबत जाऊन हिंदुत्व सोडलं या नरेटिव्हचा शिंदेगटाला आणि भाजपला विधानसभा निवडणूकीत फायदा झाल्याचं दिसलं. तर विधानसभा निवडणूकीत अल्पसंख्याक मतदारांनी देखिल महायुतीला पसंती दिल्याचं दिसलं. तसंच नगरसेवकांनी देखिल आपण हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जाज्वल्य हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत महापालिका लढवण्याची घोषणा केलीये.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आधीही हिंदुत्वासाठी लढत होती उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याची गर्जना करत आपली हिंदुत्त्वाची भूमिका लोकापर्यंत पोहचवण्याचं शिवसैनिकांना आवाहन केलंय. त्यामुळे आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मविआतून उद्धव ठाकरे एकला चलो रे ची भूमिका घेतात का हे पाहणं देखिल महत्वाचं ठरणारेय.