जागतिक एचआयव्ही पंधरवाडा अमरावती शहरात जनजागृती रॅली
जागतिक एच आय व्ही पंधरवडा साजरा केल्या जातं आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 4 डिसेम्बर रोजी भव्य अश्या रॅली चे आयोजन करण्यात आले होते हि रॅली ऐतहासिक असल्याचे दरवर्षी रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्था च्या प्रतिनिधीचे मत होते. सकाळी जिल्हासामान्य रुग्णालय येथून सदर रॅली ची सुरुवात जिल्हाधिकारी मा. सौरभ कटियार सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली अँकर
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ६ डिसेम्बरला मुंबई येथील चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी लाखो अनुयायी जातात त्याच्या सोयीसाठी ह्या रेल्वे धावणार आहेत.
अमरावती जिल्ह्यामध्ये वैध्यकीय खाजगी महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खाजगी रुग्णालय, 2 लैगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खाजगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य एच आई व्ही साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्या मध्ये एच आई व्ही ची जनजागृती करण्याच्या उदधेशाने जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले या रॅली मध्ये शहरातील महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या रॅली मध्ये 2500 विध्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून HIV जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या. रॅली ची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालय मधून करण्यात आली आणि रेल्वे स्टेशन, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इर्विन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मा. अतिरिक्त जिल्हा शल्य डॉ. प्रदीप निरवणे, अजय साखरे यांच्या उपस्थिति मध्ये समारोप करण्यात आला.रॅली यशस्वी करण्या साठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ नागपूर यांच्या अधिनस्त महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर महाविद्यालय च्या स्वयंसेवक यांनी श्री प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शन खाली आणि लोकेश पवार, दामोदर गायकवाड, नरेश मंथपूरवार, प्रमोद मिसाळ, ब्राम्हआनंद सावरकर, सुरज भोयर, श्याम वहाणे, प्रवीण म्हसाळ, वृषाली घडेकर, प्रिती हांडे आदींनी परिश्रम घेतले