LIVE STREAM

Maharashtra

भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत भूकंपाचे धक्के, पहाटे पहाटे जमीन हादरली

भंडारा : जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल आहे.

सध्यातरी कोणतीही जीवितहानी नाही
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची झालेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

यावेळी भूकंपाची तीव्रता तुलनेने अधिक
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राशी लागून असलेल्या तेलंगाणा या राज्यातील मुलुगू हा या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. महत्त्वाचे म्हणजे याआधीही याच भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यावेळी मात्र भूकंपाची तीव्रता अधिक होती. परिणामी या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बसले. यात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही इतर राज्यांच्या सीमेवरही हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हे घटना घडल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यात पालघरमध्ये भूकंप
पालघर जिल्ह्यातही अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवले होते. डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचा (Earthquake) धक्का बसल्याने पुन्हा एकदा दोन्ही तालुक्यातील गावे होती. तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 47 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल, डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ होता. मागील 2018 पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र अशा प्रकारे भूकंपाचे धक्के बसल्यामुळे तेव्हा नागरिकांत भीती पसरली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!