महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष रेल्वे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती मुंबई अनारक्षित एक फेरी विशेष गाडी क्रमांक 01218 ही गाडी पाच डिसेंबर रोजी अमरावती येथून सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 24 मिनिटांनी पोहोचणार आहे तर परतीची विशेष गाडी क्रमांक 01217 ही 7 डिसेंबर रोजी सकाळी शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोचणार आहे. बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव नांदुरा मलकापूर भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव मनमाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असे निश्चित केलेले रेल्वे स्टेशन आहेत गाडीच्या संरचनेमध्ये 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहतील महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दीक्षाभूमीला जाणाऱ्या प्रवाशांनी या विशेष गाडीची नोंद घ्यावी व प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल आहे.