तिन्ही नेते एकत्र अन् खळखळाट ; व्हिडिओ होतोय व्हायरल , अजितदादा सर्वात आनंदी असण्याचे गुपित काय ?

महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे सरकारमध्ये राहणार की नाही याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतील अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर अजित दादा इतकं आनंदी कसे असा प्रश्न राजकीय जाणकारांमध्ये उपस्थित होतोय.
काय होता किस्सा
राजभवनात जाऊन महायुतीच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर सामुहिकपद्धतीने पत्रकार परिषदेत घेत तिन्ही प्रमुख नेत्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये राहण्याविषयी विनंती केली. त्यावेळी पत्रकारांनी त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हे रात्रीपर्यंत लक्षात येईल.
परंतु मी स्वत: शपथ घेणार आहे हे निश्चित आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये आणि उपस्थित पत्रकारांम ? ध्ये एकच हश्या पिकला. यात अजित पवारदेखील जोरजोरात टाळ्या टिपत असत होते. त्यांच्या इतक्या आनंदी चेहऱ्यामागील रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. अजित दादा इतके आनंदी का याचं उत्तर हे विधानसभा निवडणुकीच्या निकालात आहे. त्यांच्या दोन्ही हातात लाडू आहे.
विधानसभेत जिंकत अजित पवारांनी राजकारणाती आपलं स्थान अजून मजबूत केलंय. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होत महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यात त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीसुद्धा त्यांना मोठा फटका बसला.
यामुळे विधानसभा निवडणुकीत जर अजित पवार यांचा पराभव झाला असता तर त्यांचे राजकीय अस्तित्व मिटलं असतं. परंतु विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत अजित पवार यांनी निवडणुकीत मोठा विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५९ जागा मिळाल्या होत्या. यात त्यांनी बारामतीसह ४१ जागा जिंकल्या.
अजित पवार यांची राजकीय ताकद वाढली
राष्ट्रवादी पक्ष असा एक पक्ष आहे, जो नेहमी सत्तेत राहणारा पक्ष आहे. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेससोबत १५ वर्ष सत्तेत राहिली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते मंत्रिपदावर गेले आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचं नेतृत्त्वही त्याच व्यक्तीकडेस जाते जो नेत्यांना सत्ता मिळवून देईल.शरद पवार आपल्या राजकीय कुटनितीमुळे राजकारणातील चाणक्य समजले जातात. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत फक्त १० जागा मिळाल्या आहेत.तर अजित पवार हे सत्तेत असणार आहेत.
त्यांचे १० आमदार मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतील. तसेच पुढील पाच वर्ष त्यांच्या पक्षात कोणतीच नाराजी होणार नसल्याचं दिसत आहे. त्यानंतर राज्यसभा खासदार बनवण्याची एक शक्यता आहे. तसेच विधान परिषदेत त्यांची भागीदारी मिळणार आहे. त्यामुळे जर शरद पवार हे राजकारणात मागे पडत राहिले तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अजित पवार हेच पुढे येतील असं म्हटलं जात आहे.