LIVE STREAM

Accident NewsMaharashtra

 दुर्दैवी घटना, फॅनगिरी जीवावर बेतली; पती आणि मुलांसोबत ‘पुष्पा २’ पाहायला आलेल्या महिलेचा मृत्यू

दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ असते त्याहून अधिक चर्चा ही हे सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांची होती. सिनेमाचं , कलाकारांच इतकं वेड की अनेकदा त्या घटनाही घडल्या आहेत. अशीच घटना आता पुष्पा २ सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान घडली असून या घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमानं प्रदर्शित व्हायच्या आधीच धुमाकूळ घातलाय. पण आता याला कुठं तरी गालबोट लागल्याचं चित्र आहे. हैदराबाद इथल्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा २: द रूल चा प्रिमियर होता. या प्रिमियरला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाही पोहोचले होते. तर आवडत्या अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तिथं एकच गर्दी केली होती.

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला पाहायला आलेल्या चाहत्यांची गर्दी इतकी वाढली की, तिथं एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची घटना घडली. या सगळ्यात दोन जण गंभीर जखमी झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही करावा लागला. या घटनेतील एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारांदरम्यान त्याच्या मृत्यू झाला. त्यामुळं या घटनेतील मृतांची संख्या ही दोन झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिलसुखनगरची रहिवाशी असलेली ३९ वर्षीय रेवती पती आणि दोम मुलांसोबत या स्पेशल स्क्रिनिंगला आली होती. जेव्हा रेवती पती आणि मुलांसोबत थिएटरच्या बाहेर पडली, तेव्हा अचानक गोंधळ सुरू झाला आणि नको ते घडलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची एक झलक पाहायला आलेल्या चाहत्यांनी गोंधळ घालत धक्काबुक्की सुरू केली. या घटनेत रेवती आणि तिचा मुलगा बेशुद्ध झाले. तिथं असलेल्या पोलिसांनी तत्काळ प्रथमोपचार करत दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पण रेवतीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. तर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू या घटनेत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

शरद केळकरच्या ‘रानटी’ सिनेमाचं वेगळपण, धमाल आणि बरंच काही
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, या इव्हेंटला अल्लू अर्जुन येणार असल्याची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली, त्यामुळं लोकांनी एकच गर्दी केली होती. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक एकमेकांच्या अंगावरून जात होते. हा घटना हातळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

This will close in 21 seconds