नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात होणार आहे, या शपथविधीसाठी साधू संतांना निमंत्रण पाठविण्यात आलंय ..त्यामध्ये अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर श्री जितेंद्रनाथ महाराज यांना या शपथविधीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे, जितेंद्रनाथ महाराज यांना शपथविधीचं निमंत्रण मिळाल्यामुळे धार्मिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
मुंबईच्या आझाद मैदानावर नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होतोय या शपथविधीसाठी मान्यवर मंडळींसह संतानाही आमंत्रण देण्यात आल आहे मान्यवर मंडळींच्या शुभेच्छांसह संतांचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस घेताहेत अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे अधिपती श्री जितेंद्रनाथ महाराज यांनाही आमंत्रण आलाय व महाराज या शपथविधीसाठी पोहचताहेत जितेंद्रनाथ महाराजांना आमंत्रण मिळाल्याने धार्मिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे .