Accident NewsMaharashtra
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्…

कोल्हापुरात सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या टँकरचा भीषण अपघात झालाय. भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर फोंडाघाटात पलटी झालाय. दरम्यान, हा टँकर फोंडाघाटात पलटी झाल्याने घाटात भीषण आग लागलीये. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला.
त्यानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. दरम्यान, टँकरच्या आगीमुळे फोंडा घाटात वाहतूक ठप्प झाली आहे. आग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग आटोक्यात आणल्यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना झाले आहेत.