मोरबाग प्रभागात स्वच्छतेची ऐशी तैशी नागरिकांचा आक्रोश

स्वछता सर्वेक्षण मध्ये मनपा अव्वलं असल्याचे बोलले जात आहे. मग अमरावती शहर स्वच्छ असायला पाहिजे ना. मात्र मोरबाग प्रभागातील दृश्य बघून खरंच अमरावती शहरात स्वच्छता अभियान सुरु आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.. रतनगंज, मोरबाग, झाडपी पुरा, आदी परिसरातील नाली तील घाण पाणी नागरिकांच्या घरात शीरत आहे, कचऱ्याने नाल्या तुडुंब भरल्या आहे. एक वर्षा पासून धुवारणी फवारणी पाहिली नाही असा संताप येथील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केला आहे
अमरावतीच्या रतनगंज, मोरबाग, झाडपी पुरा, आदी परिसर हा शहराचाच भाग आहे कि नाही असा प्रश्न पडतो नाली तील घाण पाणी नागरिकांच्या घरात शीरत आहे, कचऱ्याने नाल्या तुडुंब भरल्या आहे. एक वर्षा पासून धुवारणी फवारणी पाहिली नाही असा संताप येथील नागरिकांनी सिटी न्यूज कडे व्यक्त केला आहे. एकीकडे अमरावतीला स्वच्छतेसाठी अवॉर्ड मिळालं आहे दुसरीकडे शहरातील काही भागात माणूस म्हणून राहण्याची सोय नाही नाल्यांमधील कचऱ्याचा उपसा महिनो न गिनती झालेला नाही त्यामुळे नाली तील सांडपाणी रहिवाशांच्या घरात शिरते आहे . नालीतील सडघाण अळ्या जीवजन्तु नागरिकांच्या घरात शिरताहेत घरासमोरच्या बोळीत पाणीच पाणी झालं आहे या घाणेरड्या पाण्यातून रहिवाशांना चालत जावं लागतं नाल्या तुंबल्याहेत त्यामुळे नालीतून सांडपाणी न वाहता नालीबाहेरून वहात आहे शेवटी रहिवाशांनी स्वतः नालीत उतरून कचरा काढला . कंत्राटदार मनमानी करतात स्वच्छता करता नाहीत असे आरोप नागरिकांचे आहेत नागरिकांनी सिटी न्यूजला संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत .