विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविलेल्या महायुतीचे सरकार आज स्थापन होणार आहे…

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविलेल्या महायुतीचे सरकार आज स्थापन होणार आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा भव्यदिव्य सोहळा आज आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. रोज आझाद मैदानावर फिरणाऱ्यांची व क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची गर्दी असते. आज मात्र, या ठिकाणी भव्य मंडप उभारला असून मैदानावर आलीशान सोफे, हिरवे गालिचे टाकण्यात आले आहे. मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर व्यक्ति उपस्थित राहणार आहेत. १९ राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन होत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आज शपथ घेतील. राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला, तरी आता गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची पद्धती सुरू झाली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलपेक्षा, मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणं किंवा त्यानिमित्तानं शक्तिप्रदर्शन करणं हे आता हळूहळू रुढ झालं आहे. आज महायुतीच्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नवं सरकार या आझाद मैदानावर शपथ घेत आहे.
राज्यात मंत्रिमंडळाचा प्रश्न अखेर सुटला , राज्यात तिसऱ्यांदा फडणवीस सरकार ५ डिसेम्बर ला अंमलात येणार आहे .. ५ डिसेम्बर च्या सायंकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर महाशपथ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे ,, याचीच आता जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे , या महाशपथविधी समारोपाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा सह भाजपाचे वरिष्ठ नेते सह इतर ४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे .. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार सोबतच एकनाथ शिंदे शपथ घेणार आहे ,, हा महाशपथविधी चा आनंद राज्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा सर्वत्र जल्लोष व्यक्त करणार आहे ,, याच शपथविधी महासमारोहाचे आमच्या सिटी न्यूज चॅनल वर थेट प्रक्षेपण राहणार आहे