धारणीमध्ये फटाके फोडून, पेढे वाटून दिव्यांग बांधवानी केला जल्लोष
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सरकार व देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी सोहळा संपन्न झाला या आनंदात धारणी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या होली चौक कार्यालया समोर जल्लोष केला तसेच थेट बस स्थानका पर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला
भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्या बद्दल धारणीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथ घेतल्याचा आनंद भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या होली चौक कार्यालय समोर आनंद साजरा केला तसेच थेट बस स्थानक परीसर पर्यंत आतिषबाजी चालली या वेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते ढोल ताशे वाजवत व फटाक्यांच्या आतीशबाजी करून व लाडु पेढे वाटुन आनंद व्यक्त केला या वेळी उपस्थित शहर अध्यक्ष शाम गंगराडे,माजी तालुकाध्यक्ष सुरेन्द्र पटेल, महामंत्री सुधाकर फडके, महेश मालवीय, उपाध्यक्ष दीपक मालवीय,जया खंडारे,एडवकेट प्रेम कोगेकर शमा चौकसे, मालती कास्देकर व प्रसिद्धी प्रमुख संदीप राऊत उपस्थित होते.