दोन कुटुंबात जुना वादावरून हाणामारी, एक गंभीर

नांदगाव पेठ पोलीस स्टेशनं हद्दीत असलेल्या शासकीय वसतिगृह समोर तांडा ने राहणाऱ्या दोन कुटुंबात रविवारी सकाळी तुफान राडा होऊन एकमेकांवर हल्ला चढवीण्यात आला. शिंदे व तांबे कुटुंबात दिवाळी च्या वेळेस भांडे वरून पैशाचा वाद निर्माण झाला होता.तोच वाद रविवारी सकाळी निर्माण होऊन चाकू सह इतर साहित्याने एकमेकांवर हल्ला करून अनेक जण जखमी झाले आहे.. यात शिंदे कुटुंबातील 24 वर्षीय दादाभान सुभाष शिंदे, याच्यावर चाकू ने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. तर 50वर्षीय रघुनाथ किशन शिंदे, 30वर्षीय पंचफुला सुनील शिंदे, जखमी झाले तर तांबे कुटुंबातील 40 वर्षीय गयाबाई धर्मा तांबे, 23वर्षीय मंगेश धर्मा तांबे, 23वर्षीय ईश्वर विश्वनाथ तांबे, 20वर्षीय शालू रमेश तांबे, 30वर्षीय किरण धर्मा तांबे असे अनेक जण जखमी झाले आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी धाव घेऊन जखमी ना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पोलिसांनी या प्रकरणात दोन्हीही कुटुंबाच्या तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे
शासकीय वसाहत नांदगाव पेठ मध्ये सकाळी 9 वाजता एकाच समाजातील दोन गटात हाणामारी, दगडफेक, चाकू हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी, नांदगाव पेठ पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल, पोलिसांनी परिस्थिती नियतंत्रणात आणली