परतवाडा येथील पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राला टाळे

परतवाडा येथील अंजनगाव मार्गावर पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी 2019 मध्ये सामाजिक वनीकरण विभाग अचलपूर यांच्या विद्यमानाने 18 लाख 19 हजार रुपये खर्च करून कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावाच्या पाण्यावर 12,331 वृक्षांची इथे लागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा तीन वर्षाचा जो कार्यकाळ होता तो संपला. हा कार्यकाळ संपल्यानंतर याला हस्तांतरित करण्यात आले नाही. मत्स्य व्यवसाय व शेतीसाठी कृत्रिम तलाव वापरला जाऊ शकतो तसं काहीही न होता आता या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा हैदोस आहे गुरडोर इथे चरतात या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर आहे. वृक्षतोड होते आहे 12000 पेक्षा जास्त झाडे इथे लावली होती ती भविष्यात इथे राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने येथे एक चौकीदाराची नेमणूक केली आहे. परंतु त्यांनाही ना जुमानता असामाजिक तत्वांची गुंडागर्दी सुरू आहे