बडनेरा नवी वस्ती तील मिलचाळ परिसरातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून

गेल्या अनेक वर्षापासून बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात मिलचाड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे मी चाळीतील काही भागात बेसुमार पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे प्रसंग हातपंपाच्या दूषित पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागत आहे नागरिकांची ही पाण्याची समस्या दूर करण्याकरता नव्यानेच जलवाहिनी करण्यात आली तरीसुद्धा ही समस्या कायम आहे म्हणून परिसरातील शेकडो महिला व पुरुष नागरिकांनी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले संतप्त महिलांनी पाईपलाईन काढण्याचा प्रयत्नही केला मात्र काही समजूतदार लोकांच्या माध्यमातून त्यांच्या संतप्त भावनना आवर घालीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्याअधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोलणी करून संबंधितांना अल्टीमेटम देण्यात आला आहे.
याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांचे प्रतिनिधी अजय जैस्वाल व सिद्धार्थ बनसोड तसेच गेल्या वीस वर्षांपासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक प्रकाश बनसोड प्रहार चे उमेश मेश्राम आणि असंख्य नागरिक उपस्थित होते पाणीपुरवठा नियमित व पुरेसा झाला नाही तर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला गेल्या वीस वर्षापासून माझी नगरसेवक प्रकाश बनसोड हे या प्रभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे लोकप्रतिनिधी आहेत.
प्रहारचे उमेश मेश्राम सुद्धा नागरिकांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याकरता अग्रेसर असतात आता सर्व प्रतिनिधी एकत्र येऊन जन आंदोलन उभारले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा विरोधात एल्गार पुकारला, संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी केली तेव्हा अधिकाऱ्यांना एका दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे या संदर्भात अंत्यपद्धती मच्छिंद्र भटकर यांनी उपस्थित आमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आता या सर्व पक्षीय आंदोलनाचा व जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमवर कोणता निर्णय घेण्यात येतो की या मधुन कोणती राजकीय खेळी समोर येते.की नागरिकांना वेठीस धरले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.