LIVE STREAM

BollywoodLatest News

तुमच्या फार्महाउसचा एरिया किती ? दादा कोंडके यांच्या उत्तरानं शक्ती कपूर यांची झालेली बोलती बंद …

मुंबई : सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कोट्यवधींची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. पण मराठी सिनेइंडस्ट्रीतही अनेक दिग्गज आहेत आणि होऊन गेले की त्यांच्या संपत्तीची चर्चा झाली होती. यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेता दादा कोंडके. दादा कोंडके यांच्या निधनाला आता अनेक वर्षे झाली असली तरी, त्यांची आजही चर्चा सुरू असते. दादांच्या फिल्मी करिअरच्या जितक्या चर्चा झाल्या,तितकी चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि त्यांच्या संपत्तीची झाली. एक खास किस्सा नेहमी चर्चेत असतो.बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांनी दादा कोंडके यांचा एक खास किस्सा शेअर केला होता.

दादा कोंडके यांच्या दिलखुलास स्वभावाबद्दल अनेक कलाकार बोलतात. अनेकांनी त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. दादांच्या संपत्तीवरून आजही वाद-विवाद सुरू असले तरी दादा हे मोठ्या मनाचे होते, हे अनेकांनी सांगितलं. एका व्हिडिओच शक्ती कपूर यांनी दादांबद्दलच्या खास गोष्टी शेअर केल्या होत्या.दादा कोंडके यांच्यासोबत मला काम करायला मिळणं खूप काही शिकवणारं होतं. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असंही शक्ती कपूर यांनी म्हटलं होतं.

‘आगे की सोच’ या चित्रपटात मी दादांसोबत काम केलंय. या सिनेमाचं बरंच शूटिंह हे दादांच्या फार्महाऊसवर होतं. यावेळी मी दादांनी आपलं सहज विचारलं होतं की, दादा… तुमच्या या फार्महाऊसचा एरिया किती आहे? शक्ती कपूर यांच्या या प्रश्नावर दादांनी असं काही उत्तर दिलं होतं की, शक्ती कपूर यांची बोलतीच बंद झाली होती.

दादांचं उत्तर ऐकल्यावर मी अवाक् झालो होतो, असंही शक्ती कपूर यांनी या व्हिडिओत सांगितलं. ‘तुझी नजर जिथंपर्यंत जाईल, तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे… असं दादा म्हणाले होते.

इतक्या कोट्यवधींच्या जागेचा मालक माझ्यासोबत होता, पण त्याला त्याचा काहीच गर्व नव्हता…असं शक्ती कपूर म्हणाले होते. तसंच शूटिंग सुरू असताना दादांच्या फार्महाऊसवर गावकऱ्यांची ये-जा असायची. रोज संध्याकाळी दादांना भेटायला गर्दी व्हायची. गावातले म्हातारी मंडळी असो किंवा तरुण मंडळी…समस्या घेऊ दादांकडे यायची. या सगळ्यांना दादा मदत करायचे, असंही शक्ती कपूर यांनी सांगितलं होतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!