LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

राज्य सरकारची ‘लेक लाडकी’ योजना, मुलींना मिळणार १ लाख रुपये! कुठे आणि कसा कराल अर्ज ?

पुणे : स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, पालकांनी त्यांच्या जन्माचे स्वागत करावे यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून, त्याला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेत आतापर्यंत ५४०० इतके अर्ज मंजूर करण्यात आले असून, या मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मुलींच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, त्यांच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार आहे.

योजनेमुळे होणारे लाभ –

एप्रिलमध्ये राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. त्या योजनेला लोकसभा; तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातून ७३९२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्या मंजूर अर्जदार मुलींच्या बँक खात्यात जन्मानंतरचा पहिला पाच हजार रुपयांचा हफ्ता वर्ग करण्यात आला आहे. उर्वरीत १९९२ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी असून, त्या दूर करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारांना करण्यात आल्या आहेत. अद्यापही पात्र लाभार्थींना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेमुळे मुलींचे शिक्षण आणि सामाजिक दर्जा सुधारेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला

कसा कराल योजनेसाठी अर्ज ? –

लेक लाडकी योजनेसाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे अर्ज करता येईल. शहरी भागात अंगणवाडी सेविकांसह मुख्य सेविकांकडे अर्ज करता येईल. हा अर्ज पडताळणीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्ज महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे किंवा उपनगरातील नोडल अधिकाऱ्यांकडे जाईल. ‘लेक लाडकी’ योजना मुलींचे आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यातही या योजनेमुळे मदत होईल. त्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!