सख्या भावाने भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने केला प्रहार

शिल्लक कारणावरून आजकाल नातेवाईकांवर जीवघेला हल्ला करण्याच्या घटना घडत आहे अशीच घटना सिटी खापर्डे बगीचा परिसरात घडली, सख्या भावाने भावाच्या डोक्यावर दुचाकीच्या डिक्कीतून कुऱ्हाड काढून हल्ला केला, जखमी भावाला आधी जिल्हा सामान्य रुग्णालय नंतर खाजगी रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले, जखमी भावाच्या तक्रारी वरून पोलिसांनी भावाविरुद्ध गुन्हे दाखल केले.
आजकाल शिल्लक वादावरून एकमेकांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना घडतच आहे, यात रक्तनाते सुद्धा आजच्या युगात विसरले जात आहे, अशीच जीवघेणा हल्ल्याची घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील खापर्डे बगीचा परिसरात घडली, दोन्ही भावात नेहमी कोणत्या नां कोणत्या कारणावरून वाद निर्माण व्हायचे अशी पोलिसांकडून माहिती मिळाली आहे, भावाला शेतीचे पैसे मिळाल्याने आईने त्याच्या भावाच्या दाताचा उपचाराला त्याच्या कडे पैसे मागितले, यात त्याने पैसे न दिल्याने वाद निर्माण झाला, बाहेर जाऊन रात्री दुचाकी ने घरी परत आला असता त्याला आई व भाऊ भाऊ घराजवळ बसलेले दिसून आले. अशात त्याने दुचाकी च्या डिक्कीतून कुऱ्हाड काढून भावावर हल्ला करून जखमी केले. नातेवाईकांनी तात्काळ जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले .. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या भावा विरुद्ध कलम ११८, १ अंतर्ग्रत गुन्हे दाखल केले आहे.