LIVE STREAM

Crime NewsMaharashtra Politics

आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाची हत्या झाल्याचे समोर, मृतदेहाबाबत मोठी अपडेट

आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण झालं होतं. मांजरा परिसरात ही घटना घडली घडली होती. . मात्र, अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे.

अधिकची माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढताना दिसत आहे.. पाच दिवसात पाच खून झाले.. घरफोड्या वाढल्या आहेत.. एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली.. सत्ताधारी पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या सख्ख्या मामाचं आज सकाळी अपहरण करण्यात आलं होतं.

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ, (वय 55) नेहमीप्रमाणे आज सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते.. घरापासून काही अंतरावर जातात चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबल.. आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं.. जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटुंब यांना याबद्दल कळवले..

नेमकं कोण होते सतीश वाघ ?

सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत.. याशिवाय सतीश वाघ शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांचा व्यवसाय देखील आहे.. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत.. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेतायत.. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं.

पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचा अपहरण झाले.. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला.. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय.. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे.. अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी खास पथक तयार केली आहे..

सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराचं पुण्यासारख्या शहरातून अशा प्रकारे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे… त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.. पुण्यातील ही वाढती गुन्हेगारी कधी थांबणार असा प्रश्न भयभीत झालेले नागरिक विचारताना दिसत आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!