गुरुवारी डाक अदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 10 : भारतीय डाक विभागामार्फत गुरूवार, दि. 12 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक, डाकघर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता होणार आहे.
पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर अशा तस्सम तक्रारीबाबतचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
डाक अदालतीसाठी सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाकघर अमरावती विभाग, अमरावती 444 602 यांच्याकडे सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव आणि हुद्दा आदी उल्लेख करुन दि. 12 डिसेंबरपर्यंत पाठवावेत, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.