बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराचा निषेध

बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्याकरीता मंगळवारी विशाल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाने अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा समस्त हिंदू एकतेचे दर्शन घडविले आहे. सकल हिंदू समाजातील विविध मठ, मंदिरे, अध्यात्मिक व धार्मिक संस्था व संस्थान, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, सार्वजनिक उत्सव मंडळ, ज्ञाती संस्था, मान्यवर साधू, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी व अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी, सर्व मातृशक्ती एकत्र येत या विशाल जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते
बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रचंड मोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती बांधून बांगलादेशातील स्थितीचा निषेध करण्यात आला जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यानजीक विविध संघटना, मातृशक्ती,वैष्णव हिंदू परिषद, बजरंग दल,भारतीय जनता पक्ष, पुलक मंच परिवार,इस्कॉन यासह सकल हिंदू, जैन शीख, बौद्ध बांधव सकल हिंदू समाजातील विविध मठ, मंदिरे, अध्यात्मिक व धार्मिक संस्था व संस्थान, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, सार्वजनिक उत्सव मंडळ, ज्ञाती संस्था, मान्यवर साधू, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी व अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी, सर्व मातृशक्ती निषेध मोर्चात सहभागी झाले . जय श्रीराम , जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता कि जय अशा घोषणांनी अमरावती दणाणली.मोर्चेकऱ्यांच्या हातात फलक होते हिंदू एक है तो सेफ है, हिंदू कि रक्षा यही मेरी दीक्षा,चिन्मय प्रभू कृष्ण को रिहा करो, सेव हिंदू ऑफ बांगलादेश, बांगलादेशी हिंदू के साथ भारत के हर हिंदू का हात असा मजकूर फलकांवर लिहिलेला होता .बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराचा निषेध मोर्चेकऱ्यांनी केला .मोर्चामध्ये माजी खासदार नवनीत राणा ,ऍड. प्रशांत देशपांडे, शिवराय कुलकर्णी, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, जयस्तंभ चौक ,जवाहर गेट मार्ग – बापट चौक – श्याम चौक – राजकमल चौक या मार्गाने निषेध मोर्चाने भ्रमण केलं…. राजकमल चौकात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत प. पू. संदीप मुनी जैन महंत , प.पू. संत राजेशलाल साहेब ,प.पू.नित्य हरिनाम प्रभुजी इस्कॉन, ह .भ. प.ज्ञानेश्वर महाराज पातशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटनमंत्री बंटी पारवानी मंचावर उपस्थित होते.
मुख्य वक्ता म्हणून प्रा. डॉ सतीश चाफले,नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक तसेच
नागपूर विद्यापीठातील विविध
प्राधिकरणावरील सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनीउपस्थितांना सम्बोधीत केलं.