भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक
परतवाडा घटांग मार्गावर वझ्झर नजीक दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली हि धडक इतकी भीषण होती कि दुचाकीवरीक दोघांचाही अपघातात जागीच अंत झाला दुचाकीच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या . दुचाकीवरील सामान अस्ताव्यस्त फेकल्या गेलं येथे नागरिकांनी गर्दी केली काही वेळ येथील वाहतूक खोळंबली होती परतवाडा पोलिसांनी दाखल होऊन येतील परिस्थिती सांभाळली
परतवाडा येथील धारणी मार्गावरीळ वझर फाट्याजवळ जवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत . मृतकांमध्ये घाट लाडकी येथे राहणारा गजानन शनिवारे व भूलोरी मेलघाट चा रहिवासी अजय जामुनकर चा समावेश आहे. भरधाव वेगाने विपरीत दिशेने येणारे दोन्ही वाहन एक दुसऱ्यावर आदळले . यामुळे दोघं युवक जागेवर ठार झाले. अपघात झाल्याने धारणी मार्गावर काही वेळासाठी ट्रॅफिक जाम झालं होतं. मृतकाच्या नातेवाईकांना सूचना देऊन परतवाडा पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. वझर फाट्यावर झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली आहे