सामाजिक कार्याबद्दल श्रद्धा डोंगरदिवे यांचा भावपूर्ण सत्कार
सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रद्धा डोंगरदिवे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला महिमा का आंचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नागपूरच्या नेल्सन हॉल येथेआयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्रद्धा डोंगरदिवे यांना पुरस्कार देण्यात आला.
श्रद्धा डोंगरदिवे या गेल्या २० वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या स्वतः हाय इमरजेंसी ड्युटीवर असतात असं असतानाही रक्तदान शिबिर, पेशनर लोकांना वॉकरचं वाटप, अन्न वा धान्य वाटप, समाज जागृती कार्यक्रम अशा आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील श्रद्धा डोंगरदिवे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल महिमा का आंचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे यांनी घेतली व त्यांच्या कार्याची पावती म्हणून नागपूरच्या नेल्सन हॉल येथे महिमा का अंचल या मासिकाच्या कमिटीतर्फे श्रद्धा डोंगरदिवे यांना शेकडो लोकांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं त्यांच्या या गौरवाने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे या पुरस्काराबद्दल श्रद्धा डोंगरदिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.