२० डिसेम्बरपासून सुरु होणाऱ्या बहिरम यात्रेची तयारी सुरु

विदर्भाची सर्वात मोठी असलेली बहिरम बुवा ची यात्रा एक महिना चालते. दिनांक 20 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या जत्रेमध्ये फक्त हिंदूंनी दुकान लावावी अशी मागणी हिंदू वाहिनी व भाजपा नेत्यांन कडून करण्यात आली होती. यामुळे मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर अफवांचा बाजार पसरला होता. परंतु चांदुर बाजार पंचायत समिती द्वारे मंगळवारी बारा वाजता पासून शांततेत सुवस्थेत पारदर्शी रित्या प्लॉटची नीलामी सुरू झालेली आहे.
सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या बहिरम बुवांचे लाखो भक्त आहेत नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक बहिरमला येतात सर्वात मोठी जत्रा बहिरम येथे भरते ही यात्रा एक महिना चालते.यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकान लागतात त्यांची बोली लावली जाते दिनांक 20 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या यात्रे मध्ये फक्त हिंदूंनी दुकान लावावी अशी मागणी हिंदू वाहिनी व भाजपा नेत्यांन कडून करण्यात आली होती. यामुळे मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर अफवांचा बाजार पसरला होता. परंतु मंगळवारी चांदुर बाजार पंचायत समिती च्या वतीने बारा वाजता पासून शांततेत सुवस्थेत पारदर्शी रित्या प्लॉटची बोली सुरु झाली आहे . येथे हिंदू मुस्लिम व अन्य सर्व समाजाचे व्यापारी गण एकजूट होऊन व्यापार करतात. प्लॉटची बोली फक्त हिंदू व्यापाऱ्यांसाठी व्हावी अशी मागणी काही संघटनांनी केली होती. परंतु पंचायत समिती चांदूरबाजार यांच्या माध्यमातून जो प्लॉटची बोली जास्त लावणार त्यालाच प्लॉट विकण्यात आलेला आहे. बहिरम येथे कोणत्याही प्रकारची शांतता सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. येथील काही व्यापाऱ्यांनी सिटी न्यूज ला प्रतिक्रिया.दिल्या