दुकानातून विक्री होत असलेला 2 लाख 25हजाराचा चायना मांजा केला जप्त

देशात मकर संक्राती ला पतंग उडविण्याची परंपरा असतांना मात्र आता जीवघेणा चायना मांजा चा मोठया प्रमाणात वापर केला जात आहे.. चायना मांजा मुळे अनेक निरपराध नागरिक जखमी झाले तर अनेकांना आपला जिवं गमवावा लागला अशांत आता पोलीस प्रशासन सह मनपा प्रशासना ने कठोर पाऊल उचलून थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे..
या दरम्यान फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात योगायोग कॉलनीत छापा टाकून तब्बल 1लाख 25हजार रुपये किमतीचा चायना मांजा जप्त केला..रुपेश जनार्धन दिवाण वय 40राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट हा आपल्या घरात जय गुरुकृपा जनरल स्टोअर्स मध्ये चायना मांजा सह चक्री विकत असताना पोलिसांनी धाड टाकून सर्व साहित्य जप्त केले.
त्याच्या विरुद्ध कलम 223 सहकलम 5 पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई केली.. ही कारवाई पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडी यांच्या आदेशाने फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन पोलीस कर्मचारी शशिकांत गवई सुभाष पाटील,सचिन बोरकर सागर चव्हाण, जावेद पटेल यांनी केली.