बारापेक्षा अधिक ओलावा असलेले सोयाबीन खरेदीस नकार; नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर ५१ हजार क्विंटल खरेदी

सोयाबीन खरेदी केंद्र नांदेड :- सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नाफेडचे हमीभाव केंद्र सुरु केले आहे. या केंद्रांवर १२ टक्के ओलावा असलेले सोयाबीन खरेदी करण्यास सांगितले असताना नांदेडमध्ये असा सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी आणलेला सोयाबीन केंद्र चालक परत पाठवत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
राज्यभरात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने हमीभाव केंद्र सुरू केले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी असे २१ केंद्र सुरू केले आहेत. नांदेडमध्ये शासनाच्या नाफेड केंद्रावर आतापर्यंत ५१ हजार २०१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून ४ हजार ८९२ रुपये इतका भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. हमीभाव केंद्रांवर चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळत आहे.
नाफेड केंद्रांवर अधिक भाव
शासनाने हमी भाव केंद्र उशिरा सुरू केले असून सध्या या हमीभाव केंद्रावर ४ हजार ८९२ इतका दर मिळत आहे. तर नवीन मोंढा बाजारात ४ हजार २०० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारापेक्षा थोडा अधिकचा भाव नाफेड केंद्रावर मिळत असल्याने शेतकरी आपले सोयाबीन नाफेड केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत.
खरेदीस मनाई
दरम्यान नांदेडमध्ये १२ टक्के पेक्षा अधिक ओलावा म्हणजेच माउच्छर असलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्र चालक परत पाठवत आहेत. शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने किमान सहा हजार रुपये क्विंटल भाव द्यावा; अशी मागणी देखील सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत. शासनाने १२ टक्के पेक्षा कमी ओलावा निश्चित केलेला आहे. मात्र १२ टक्के पेक्षा अधिक ओलावा असलेले सोयाबीन खरेदी केलं जातं नाहील अशी माहिती नांदेड जिल्ह्या पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.